8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री !

0

नवी दिल्ली : शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करू शकतात. याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे. सध्या शिंदे गट आणि भाजपा त्या अटींवर विचार करत आहेत, ज्यावर दोघांची सहमत असेल आणि सरकार स्थापन करता येईल, अशी चर्चा सुरू आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे भाजपवर दबाव टाकतील का.

एकनाथ शिंदे यांनीही बंडखोर आमदारांची बैठक बोलावली आहे. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून, सर्व बंडखोर आमदारांचा तिथे मुक्काम आहे.

शिंदे मागणार उपमुख्यमंत्रीपद ?

पहिला आणि मोठा प्रश्न एकनाथ शिंदे स्वत:साठी उपमुख्यमंत्री पद मागणार का ? त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार यावर चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले तर शिंदे गटातील 8 आमदारांना कॅबिनेट आणि 5 आमदारांना राज्यमंत्रीपद मिळू शकते. त्याचबरोबर 29 कॅबिनेट मंत्री भाजपचे असतील. बंडखोरांसोबत आलेल्या अपक्ष आमदारांना भाजपने त्यांच्या कोट्यातून मंत्री करावे, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे.

बंडखोरांना हवीत सध्याची मंत्रिपदेच

शिंदे गटाकडे विद्यमान सरकारचे 8 मंत्री आहेत. अशावेळी या आमदारांकडे जे मंत्रिपद आधीपासून होते तेच मंत्रीपद शिंदे गटाला हवे आहे. कारण गेल्या महिनाभरात घेतलेले त्यांचे महत्त्वाचे निर्णय उद्धव सरकारने रोखले आहेत. कालच या मंत्र्यांकडून मंत्रीपदे काढून घेऊन इतर आमदारांकडे सोपवण्यात आली आहेत.

शिंदे गटाकडून कोण होऊ शकतात मंत्री ?

एकनाथ शिंदे + दादा भुसे + गुलाबराव पाटील + संदिपान भुमरे + उदय सामंत + शंभूराज देसाई + अब्दुल सत्तार + राजेंद्र पाटील यड्रावकर + बच्चू कडू (प्रहार जनशक्ती)

नवीन नावे ज्यांना मंत्री केले जाऊ शकते

दीपक केसरकर + प्रकाश आबिदकर + संजय रायमुळकर + संजय शिरसाठ यांच्या नावाचा विचार केला जात आहे.

शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदारही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात

महाराष्ट्रातील राजकीय युद्धात उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसताना दिसत आहे.
ताज्या माहितीनुसार, शिवसेनेच्या एकूण 18 खासदारांपैकी 14 खासदार बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समजते. तसे झाले तर शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर एकनाथ शिंदे यांचा दावा मजबूत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.