८० पोलीस पाटील यांना अप्पर पोलीस आयुक्त परदेशी यांनी केले मार्गदर्शन

0

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे मार्गदर्शनाखाली आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील, पोलीस पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा कार्यशाळा कार्यक्रम पार पडला.

देहूरोड पोलीस स्टेशन अंतर्गत देहुगाव येथील संत तुकाराम मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमायाप्रसंगी पिंपरी चिंचवड अप्परपोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पोलीस पाटलांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी आयुक्तालय हद्दीतील ८० पोलीस पाटील उपस्थित होते.

यावेळी पिंपरी चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्षबाळासाहेब बाजीराव शिंदे पाटील, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिलाआघाडी पोलीस पाटील संघाच्या अध्यक्ष तृप्तीताई मांडेकर पाटील, खेड तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष अमोल पाचपुतेपाटील, मावळ तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण शितोळे पाटील उपस्थित होते.

प्रमुख वक्ते मार्गदर्शक डॉ राम पठारे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक  राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी पोलीस पाटलांनामार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशांत करंडे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल पाचपुते पाटील यांनी तर सर्व उपस्थितयांचे आभार देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.