शेतकरी आंदोलनात 86 पोलीस जखमी

0

नवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत आयोजित रॅलीला हिंसक वळण लागले. राजधानी दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये सुमारे 86 पोलीस जखमी झाले असून आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्री एका उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेतला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासह शांतता प्रस्थापित करण्यासाठी निमलष्कर दलाची अतिरिक्त कुमक तैनात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव उपस्थित होते. दिल्लीतील संवेदनशील स्थळांवर निमलष्कर दलाचे जवान तैनात केले जातील, असे गृहमंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले. त्यानंतर, लागलीच निमलष्कर दलाच्या सुमारे १५ ते २० कंपन्या म्हणजे १५०० ते २००० जवान दिल्लीत दाखल झाले आहेत.  गणराज्यदिनाच्या बंदोबस्तासाठी राजधानीत यापूर्वीच निमलष्कराचे ४५०० जवान तैनात आहेत.

शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान 86 पोलीस जखमी झाले असून 45 पोलिसांना ट्रॉमा सेंटरमध्ये तर 18 पोलिसांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 15 एफआयआर दाखल झाल्या असून 8 बस, 17 गाड्या, 4 कंटेनर आणि 300 पेक्षा जास्त बॅरिकेट्स तोडल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांवर आहे.

Delhi: Heavy security deployment near Red Fort in the national capital.

’83 Police personnel were injured after being attacked by agitating farmers yesterday,’ as per Delhi Police. pic.twitter.com/AvK7DVtsEY

— ANI (@ANI) January 26, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.