पुढे हे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिं.चिं शहर (जिल्हा) व शहराध्यक्ष श्री.संजोगभाऊ वाघेरे-पाटील यांच्या माध्यमातून कोरोना रूग्नांच्या मदतीसाठी भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले. हे शिबीर काशिबा शिंदे सभागृह पिंपरी वाघेरे गांव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात जवळपास 127 पिशवी रक्तदान झाले.
रक्तदान शिबीरांचे उद्घाटन विरोधी पक्षनेते श्री.राजू मिसाळ,नगरसेवक श्री.विठ्ठल नाना काटे,नगरसेविका सौ.उषाताई संजोग वाघेरे-पाटील,नगरसेविका सौ.निकीता कदम,नगरसेविका वैशालीताई काळभोर ,नगरसेविका वैशालीताई घोडेकर,माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, पक्ष प्रवक्ते फजल शेख, खजिनदार संजय लंके, युवती अध्यक्षा कु. वर्षाताई जगताप सामजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गांगताई धेंडे, सेवादल अध्यक्ष महेश झपके, महिला संघटक कविता खराडे ,सविता खराडे, शक्रुल्ला पठाण, दीपक साकोरे, अमोल भोईटे, बाळासाहेब पिल्लेवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पद्अधिकारी,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.