सचिन वाझेचा सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझ काझीला अटक

0
मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी वादग्रस्त सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला यापुर्वीच एनआयएनं अटक केलेली आहे. एनआयए सखोल तपास करीत असतानाच आता सचिन वाझेचा सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझ काझी याला एनआयएनं अटक केली आहे. त्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.सचिन वाझे हा स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहे. त्याचा साथीदार रियाझ काझीला अटक केल्यानं अनेक गोष्टींचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता आहे. रियाझ काझी हे सन 2010 च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदावरून पदोन्नती झाल्यानंतर रियाझ काझी यांची पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकात करण्यात आली.

दरम्यान, सचिन वाझेनं 9 जूनला सीआययु पथकाचा प्रभारी म्हणून पदभार स्विकारला होता. तेव्हापासुन रियाझ काझी आणि सचिन वाझे हे एकत्र काम करत होते. दोघांचे अतिशय चांगले संबंध होते आणि आता एनआयएनं रियाझ काझीला अटक केल्यामुळे त्यांचे संबंध किती चांगले होते हे स्पष्टच झालं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.