लॉकडाऊन बाबत गुरुवार नंतर निर्णय होणार

0

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण राज्यात लॉकडाऊन संदर्भातील निर्णय 14 एप्रिल नंतर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री अर्थ विभाग आणि इतर विभागाबरोबर बैठक घेणार असून, बुधवारी कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे कोविड परिस्थितीवर राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक बोलावली होती. यात ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन करावा, यावर चर्चा केली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह राज्यातील मोठमोठे डॉक्टर उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सहभागी झाले होते. कडक निर्बंध लावण्यासंदर्भात सर्वसमावेशक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढविणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.