मुंबई : कोरोना रोखण्याचा दुसरा पर्यायच उरला नाही, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आज रात्री ८ वाजल्या पासून १५ दिवस संपूर्ण राज्यात पंढरपूर वगळता लॉकडाऊन करण्यात आलेले आहे.
# कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावावे लागतील.
# जीव वाचविणे महत्त्वाचे. उद्या रात्री ८.०० वाजल्यापासून निर्बंधांमध्ये वाढ करतोय. पंढरपूर – मंगळवेढा वगळून हे निर्बंध असतील.
# ब्रेक द चेन. राज्यात १५ दिवस १४४ कलम लागू. अनावश्यक फिरणे बंद. जनता कर्फ्यू तुम्हीच लागू करा.
# सर्व अस्थापना बंद. सकाळी ७.०० ते ८.०० फक्त अत्यावश्यक सेवा चालू.
# सार्वजनिक वाहतूक लोकल, बससेवा बंद नाहीत. त्या फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच चालू राहतील. वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, वैद्यकीय उत्पादक अस्थापने चालू राहतील.
# पावसाळीपूर्व कामे चालू राहतील. सेबी, आरबीआय, बँका चालू राहतील.
# बांधकामे, उद्योगांनी राहण्याची सुविधा वाढवून कर्मचाऱ्यांना तिथेच ठेवा. तेवढ्यापुरते उद्योग चालू ठेवता येतील.
# हॉटेल, रेस्टॉरंट फक्त पार्सल सेवा. बाहेरच्या खाण्याच्या सेवा पार्सल सेवा चालू ठेवता येतील.
# राज्य सरकारमधून अन्नसुरक्षा प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत. ७ कोटी नागरिकांना लाभ.
# शिवभोजन थाळी महिनाभर मोफत देणार. दोन लाख थाळ्या देणार. रोजी मंदावली तरी रोटी थांबू देणार नाही.
# केंद्र – राज्यांच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना १००० रूपये आधीच देणार. ३५ लाख लोकांना याचा थेट फायदा.
# नोंदणीकृत बांधकाम कामगारांना १५०० रूपये देणार. घरेलू कामगारांना १५०० रूपये देणार
# अधिकृत नोंदणीकृत फेरीवाले १५०० रूपये. ५ लाख लाभार्थी. परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रूपये देणार. १२ लाख लाभार्थी.
# आदिवासी खावटी कर्ज १२ लाख लाभार्थी. २००० रूपये देणार.
# ३३०० कोटी रूपये फक्त कोविडसाठी राखून ठेवले आहे.
# एकूण ५४०० कोटी रूपये खर्च करून जनतेला आधार देण्यासाठी बाजूला काढतोय.
# आजचा कोरोना पॉझिटिव्ह आकडा ६०२१२.वाढविलेल्या सुविधा आता कमी पडायला लागल्या आहेत.
# यंत्रणा कोलमडून पडताहेत. चाचण्यांची संख्या अडीच लाखांपर्यंत दररोज करतोय. कोविड बेड राज्यात साडेतीन लाख केलेत. ५२३ चाचणी केंद्रे राज्यात आहेत. चाचणी केंद्रांवर बोजा वाढलेला आहे.
# कोविड सेंटर्स ४००० च्या आसपास काढले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
# १२०० मेट्रीक टन उत्पादन होते. ते १०० टक्के आरोग्यासाठी वापरतो. पण ऑक्सिजनची कमतरता पडते आहे. समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेतोय. मतभेद असू देत. पण आता निर्णय घ्यावा लागेल.
# रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. याचा पुरवठा कमी पडून देणार नाही. ऑक्सिजनचा पुरवठा इतर राज्यांतून आणण्यासाठी पंतप्रधानांनी परवानगी दिली आहे. तो ईशान्येकडील राज्यांतून आणण्यासाठी विनंती पंतप्रधानांना केली आहे. हवाई वाहतूकीने एअर फोर्सला सांगून ऑक्सिजन देण्याची व्यवस्था करावी अशी विनंती पंतप्रधानांना करणार आहे. त्यांना पत्र लिहून फोन करेन.
# उद्योजक, व्यावसायिक यांना जीएसटी परतावा मुदत तीन महिने वाढविण्याची पंतप्रधानांना मागणी.
# कोरोना नैसर्गिक आपत्ती समजून संकटातील लोकांना वैयक्तिक मदत देण्याची पंतप्रधानांना मागणी.
# आत्ताची लाट प्रचंड मोठी आहे. महाराष्ट्रातले लसीकरण वाढवून लाटेचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करतोय. गेल्यावेळची लाट रोखण्यात यशस्वी झालो. पण आता लाट रोखण्यासाठी काही वेगळे उपाययोजना कराव्या लागतील.
# डॉक्टरांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करतोय. निवृत्त झालेल्या नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सरकारसोबत लढायला पुढे या.
# आता उणीदुणी काढू नका. राजकारण करू नका. राजकारण बाजूला ठेवा. पंतप्रधानांना सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविण्याचे आवाहन करतोय.