धक्कादायक… पती-पत्नीच्या नात्याला काळीमा

0

पुणे : ‘ब्ल्यु फिल्म’ दखवत पत्नीला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पती छळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘तसे’ न केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही पतीने दिली आहे. या सर्वाला सासू सासऱ्याचा पाठिंबा असल्याचे म्हंटले आहे.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 30 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासु-सासरे व नंदेवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांचा ऑक्टोबर 2020 मध्ये विवाह झाला आहे. त्यानंतर त्या डिसेंबर 2020 पर्यंत सासरी राहिल्या. पती व सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून त्यांनी घर सोडले. पती अश्लिल व्हीडीओ दाखवत होता.

तसेच त्या व्हीडीओप्रमाणेच शारीरिक संबंध करण्यास भाग पाडत. त्याने जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. तर त्यांना ‘तू असे केले नाही, तर दोघेही मोठ्या गाडीखाली आपली गाडी घालून आत्महत्या करू,’ अशी धमकी देत, असे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हंटले आहे. पतीवर मानसोपचारतज्ज्ञाकडून औषधोपचार चालू असल्याची बाब सासरच्यानी लपवून ठेवले व फसवणूक केली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.