यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हा प्रशासन व राज्य सरकारचे लक्ष वेधले

0

पिंपरी : चिंचवड महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी आमदार निधीतील २५ लाख रुपयांतून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यात यावेत , यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे . तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी आमदार निधी वापरण्याबाबत राज्य सरकारकडून ” खास बाब ” म्हणून मान्यता घेण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे . अशी मागणी आणि ही सूचना करणारे लक्ष्मण जगताप हे महाराष्ट्रातील पहिले आमदार आहेत . त्यांची सूचना राज्य सरकारने मान्य केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील आमदारांना देण्यात येणाऱ्या कोट्यवधींच्या निधीतील काही लाखांची रक्कम रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी वापरणे सहज शक्य होणार आहे . आता राज्य सरकार गोरगरीबांच्या हिताची ही सूचना लवकरात लवकर मान्य करते का ?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी राज्य सरकार वर्षाला प्रत्येकी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करते . आमदारांनी हा निधी एका वर्षांत वापरताना एक काम २५ लाखांपर्यंतच्या खर्चाचे असणे बंधनकारक आहे . वर्षाला ४ कोटींचा निधी कोणत्या विकासककामांवर खर्च करता येईल याची एक यादीच सरकारकडून तयार करण्यात आली आहे .यादीच सरकारकडून तयार करण्यात आली आहे . या यादीतील विविध प्रकारच्या कामांनाच आमदारांनी प्राधान्य देणे अपेक्षित आहे .

आमदारांनी सुचविलेल्या कामांवर जिल्हाधिकारी कार्यालयांकडून अंमलबजावणी केली जाते. परंतु , सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावात वैद्यकीय सुविधांवर आमदार निधीतील रक्कम खर्च करता येत नसल्याचे समोर आले आहे . कारण आमदार निधी खर्च करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या विविध प्रकारच्या कामांच्या यादीत सध्याच्या परिस्थितीत आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधांच्या कामांचा समावेश नाही . या अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हा प्रशासन व राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे .

सध्या कोरोना रुग्णांना जीवनदायी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शन सहज उपलब्ध सणे गरजेचे झाले आहे . परंतु , तुटवडा निर्माण झाल्याने आणि काळाबाजार होत असल्याने अनेक गोरगरीब रुग्णांना रेमडेसीवर इंजेक्शन मिळत नसल्याचे वास्तव आहे . रुग्णांचे नातेवाईक दिवसभर रांगेत उभे राहून सुद्धा रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याचे भीषण चित्र आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.