नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पण रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत अनेक नेतेमंडळींना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर आता देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
दरम्यान, यापूर्वी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोना व्हायरसची लागण झाली होती. तसेच एच. डी. कुमारस्वामी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. याशिवाय कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह अनेक नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता डॉ. मनमोहनसिंग यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.