उच्चशिक्षित चोरट्यांना अटक; महागड्या 35 दुचाकी जप्त

0

पिंपरी : महागड्या चोरून ऐष करणाऱ्या उच्चशिक्षित तिघांच्या जेरबंद करून 38 लाखांच्या 35 दुचाक्या जप्त केल्या. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दरोडाविरोधी पथकाने केली. दुचाकी चोरून ओळखीच्या नागरिकांकडे गहाण ठेवायचे आणि बदल्यात 10-15 हजार रुपये घेऊन जायचे. परत त्यांच्याकडे जात नव्हते. काही गाड्या मित्रांना वापरण्यासाठी दिल्या आहेत, असे अधिक तपासात उघडकीस आले.

आनंद धुमाळ (22), सुनील आबाजी सूक्रे (26, रा. दोघे रा. खडकवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), श्रीकांत बाबाजी पठाडे (23, रा. बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व अंमलदार यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 25 पाहिजे असलेल्या फरारी आरोपी बुलेट विक्रीसाठी भोसरी येथील वखार महामंडळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी सापळा लावला. मात्र, पोलिसांचा सुगावा लागताच आरोपींनी पळ काढला. मात्र, तांत्रिक विश्लेषण करीत आरोपींना पकडले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता 35 दुचाकी हस्तगत केल्याची त्यांनी कबुली दिली.

सुनील सुक्रे याने हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत असताना चिखली-निगडी परिसरातील चार दुचाकी चोरल्या. त्यानंतर एन्ट्रन्सशीप करीत असताना भारती विद्यापीठ परिसरातील दहा गाड्या चोरल्या. 2018 पासून दुचाकीचोरीत असल्याचे तपासात त्याने कबुली दिली. तर आनंद धुमाळ याने ऑटमोबाईलचे शिक्षण घेतले असल्याने दुचाकीचे लॉक कसे उघडायचे याची माहिती होती, त्यातून त्याने 13 दुचाकींची चोरी केली. चोरीच्या दुचाकी गहाण ठेवण्यासाठी श्रीकांत पठाडे हा त्यांना मदत करीत होती. पठाडे यानेही 8 दुचाकी चोरल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामराव पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस श्रीकांत डीसले, पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बांगे, पोलीस हवालदार मंहेश खाडे, औदुंबर रोंगे, विक्रांत गायकवाड, उमेश पुलगंम, राहुल खार्गे, राजेंद्र शिंदे, पोलीस नाईक नितीन लोखंडे, प्रवीण माने, गणेश कोकणे, राजेश कोशल, प्रवीण कांबळे, आशिष बनकर, गोविंद सुपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.