कोरोना संशयित मृत वृद्धेचे पाय धुवून पाणी पिण्यास दिलं

0

पुणे : देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, 70 वर्षीय कोरोना संशयित जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला विनंतीकरून मृतदेह घरी आणत अंत्यविधी रितिरिवाजाने पार पडला आहे. भंयकर म्हणजे, त्या जेष्ठ नागरिकाचा अंत्यविधी सुरू असताना त्याचे पायधूवून त्याचे पाणी उपस्थितीना पिण्यास दिल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शासनाच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 188 व इतर कलमानव्ये नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाणी पिल्याबाबत चौकशी सुरू करण्यात येत आहे. तर अंत्यविधीला गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जात असल्याचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले आहे. तसेच ते कोरोना पॉझिटिव्ह होते का याबाबत देखील माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कदमवाकवस्तीत हा प्रकार आज घडला आहे. 70 वर्षीय जेष्ठ नागरीक एका मोठ्या रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. दरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेला व्यक्ती मृत झाल्यास त्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता नियमांचे पालन करुन प्रशासन अंत्यविधी केले जातात. मात्र या कोरोना संशयित व्यक्तीच्या नातेवाईकांनी विनंती केल्याने रुग्णालय प्रशासनाने त्यांचा मृतदेह ताब्यात दिला. मृतदेह ताब्यात मिळताच शेवटची आंघोळ घालण्याच्या नावाखाली मृतदेह ते राहत असलेल्या ठिकाणी नेला. डझनभर महिलांनी आंघोळ घातली. तर धक्कादायक म्हणजे, नातेवाईकांनी त्यांचे पाय धुतलेले पाणी पिण्यास सुरुवात केली. हा प्रकार समोर आल्यानंतर एका कार्यकर्त्यांने याला विरोध केला. पण, त्याला गप्प बसवत हा अंत्यविधी पार पाडला गेला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.