माजी खासदार संजय काकडे व गजा मारणे यांच्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध; पोलिसांचा तपास, काकडे यांना अटक

0
पुणे  : कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे आणि माजी खासदार संजय काकडे यांच्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आहेत. मारणे रॅली प्रकरणात दाखल गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्यावर काकडे हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दबाव आणण्याची शक्यता आहे. तसेच ते साक्षीदार यांना प्रलोभन दाखवण्यापासुन धमकी देण्यापासुन किया अभिवचन देऊ शकता. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये  नमूद करण्यात आले आहेत.
मात्र मारणे आणि काकडे यांच्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नेमके कोणते संबंध आहेत यावरून अजून पडदा उठडलेला नाही.
मारणे कारागृहातुन सुटल्यानंतर रॅली काढून दहशत निर्माण करण्याचा कट कोणी रचला?, या गुन्हयाचा कट कोणत्या ठिकाणी रचला गेला ? सदर कटात आणखी कोण कोण सहभागी आहे. या गुन्हाचा कट रचाण्यामागे अटक आरोपी यांचा नक्की उद्देश काय आहे ? याबाबत काकडे यांच्याकडे तपास करण्यात येणार आहे. तसेच या सदर गुन्हयातील अटक आरोपी यांनी सोशल मिडीयावर दहशत पसरविणे करीता कोणकोणत्या साथीदारांची मदत घेतली? त्याचा गुन्हयाशी काय संबंध आहे ? याबाबत देखील पोलिस तपास करीत आहेत.
 मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यावर जंगी मिरवणूक काढली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर काढलेल्या या मिरवणुकीत शेकडो कार होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास करून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गजानन मारणेसह इतरांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात काकडे यांना चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी सकाळी बंडगार्डन पोलिसांनी काकडे यांना अटक केली. यापूर्वीही काकडे यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दरम्यान रॅली प्रकरणी मारणे विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत. काकडे यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.