प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन नवीन शाळा बांधली असून , लॉकडाऊन मुळे ऑफलाईन शिक्षण बंद असल्याने सर्व शाळा बंद आहेत.कोऱ्या करकरीत इमारतीला बघून अनेक मद्यपी , तळीराम , पत्ते खेळणारे अशा अनेक लोकांकडून इमारतीचा गैरवापर करण्यात येत आहे . प्रशासनाने सुरक्षारक्षक नेमला नसल्याने अशा लोकांचे फावत असून , आपल्या मालकीची इमारत असल्यागत त्याचा राजरोसपणे वापर चालू आहे . त्यामुळे मनपा प्रशासनाने त्वरित सुरक्षारक्षक नेमून अशा प्रकारांना आवर घालावा अशी मागणी यादव यांनी केली आहे .
या प्रकारांमुळे आसपासच्या नागरिकांनाही मनःस्ताप सहन करण्याची नामुष्की येत असून , इमारतीचे नुकसानही करण्यात येत आहे असे यादव यांनी म्हटले आहे . पुढील काळातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी लवकरात लवकरच सुरक्षा विभागाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे असे दिनेश यादव यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे . यावेळी सभागृह नेते नामदेव ढाके , फ प्रभाग सभापती कुंदन गायकवाड उपस्थित होते.