शहरातील खाजगी रुग्णांलयाना रँपिड अँन्टीजेन टेस्ट करण्यास परवानगी द्यावी

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात शेकडो खाजगी रुग्णालय आहेत यातील काही ठिकाणी कोविड सेंटर सुरु झाली आहेत परंतु कोरोनाची आर.टि.पी.सी.आर. व रॅपिड अँन्टिजेन टेस्ट फक्त मनपाच्या आरोग्य केंद्रावर होते. त्यातून संशियत व बाधित रुग्णांवर उपचार होत आहेत. त्यापैकी रँपिड अँन्टीजेन टेस्ट करणा-या नागरीकांचे प्रमाणे गेल्या एक महिन्यात हजारोंच्या संख्येने आहे.

मात्र, रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्याची  परवानगी केवळ मनपा रुग्णांलयामध्येच आहे. गेल्या काही दिवसामध्ये अनेक कंपन्यांनी कर्मचा-यांना टेस्ट रिपोर्ट अथवा आर.टि.सी.पी.आर. बंधनकारक केल्याने सर्वच मनपा आरोग्य केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. त्यातूनच कोरोना बाधित असलेल्या व्यक्तींची सुध्दा तपासणी होत असल्याने संसर्ग पसरण्याचे ठिकाण मनपाचे आरोग्य केंद्र झाले आहे.

शहरातील सर्व खाजगी रुग्णांलयांना रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्याची परवानगी दिल्यास मनपाच्या आरोग्य केंद्रावरील ताण कमी होईल, तपासणीचे प्रमाणे वाढेल, कोरोना बांधितांची संख्या कळेल व उपचार करणेही सुलभ होईल.

त्यामुळे खाजगी रुग्णालयांना रॅपिड अँन्टीजेन टेस्टला परवानगी व पॉझीटीव्ह रुग्णांना ओळखता येईल अशा दर्शनी भागावर शिक्के मारण्याची व क्वॉरंटाईन करण्यची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आयुक्तांना निवेदन द्वारे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.