त्यामुळे सिटी स्कॅनसाठी शासनाने दर निश्चित करून दिले आहेत. 16 स्लाइसपेक्षा कमी सिटी स्कॅनसाठी 2 हजार रुपये, मल्टी डिटेक्टर ( 16 ते 64 स्लाइस) साठी 2 हजार 500 रुपये आणि मल्टी डिटेक्टर (64 स्लाइसच्या पुढे) सिटी स्कॅनसाठी 3 हजार रुपये दर निश्चित केला आहे. या रकमेत सिटी स्कॅन तपासणी, अहवाल सिटी फिल्म, पीपीई किट, डीसाइन्फेकट, सॅनिटायझेशन चार्जेस आणि जीएसटी याचा समावेश आहे.
या दराप्रमाणे बील आकारणी करणे सर्वांना बंधनकारक आहे. सर्व खासगी रुग्णालये, तपासणी केंद्रे यांनी सिटी स्कॅन तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशीनच्या प्रकारानुसार) दर्शनी भागात लावावेत. निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील. निश्चित दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितांवर साथरोग कायदा, 1897 व मेस्मा कायदा 2011 नुसार कारवाई करण्याचा इशारा आयुक्त पाटील यांनी दिला आहे