‘सीबीआय’च्या ‘एफआरआय’मध्ये धक्कादायक उल्लेख

0

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. आता या आरोपप्रकरणी CBI ने देशमुख यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. तसेच अनिल देशमुख यांचे नाव आरोपी म्हणून FIR मध्ये नोंद केले आहे.

तसेच या FIR मध्ये सचिन वाझे यांच्या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा हात असल्याचेही नमूद केले आहे. एवढेच नाहीतर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सुद्धा देशमुखांवर ठेवला आहे. दरम्यान आज CBI च्या पथकाने अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर येथील घर आणि कार्यालयावर छापे मारले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने या कारवाईचा निषेध केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकार या माध्यमातून राजकीय उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे. प्राथमिक चौकशीतून काय समोर आले हे कोर्टासमोर मांडण्यापूर्वीच होत असलेल्या या कारवाईचा त्यांनी निषेध केला. राजकीय नेत्यांना बदनाम करण्यासाठीच अशा धाडीचा वापर होत असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुखावर सीबीआयने केलेल्या कारवाईवरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी यांनी ट्विट करत केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. उच्च न्यायालयाने चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. पण सीबीआय अतिरेक करत आहे, असे म्हणत दया..कुछ तो गडबड जरूर है, असा टोला कारवाई वरून लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.