‘ऑक्सिजन’ वापराबाबत खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांना सूचना

0

पिंपरी : शहरातील 135 खासगी रुग्णालयांत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 9 हजार खाटा रुग्णांसाठी आरक्षित आहेत. सद्यस्थितीत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये श्वसनाच्या वाढत्या तक्रारींमुळे अधिकाधिक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे आणि मागणीत वाढ झाल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या बाधित रुग्णांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

त्यासाठी खासगी रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. सर्व रुग्णालयांमार्फत ऑक्सिजनचा मर्यादित आणि सुयोग्य पद्धतीने वापर करावा. ऑक्सिजनचा संभाव्य तुटवडा टाळण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

रुग्णालयांमध्ये दाखल कोरोनाबाधित रुग्णांस खरोखरच ऑक्सिजनची आवश्यकता आहे काय याची खातरजमा करावी. रुग्णांची सॅच्युरेशन पातळी 92 पर्यंत मॅटेन करण्याकरिता आवश्यक प्रमाणातच ऑक्सिजनचा वापर करावा. रुग्णांच्या चेहऱ्यावर आकारानुसार लहान अथवा मोठ्या आकाराचे ऑक्सिजन मास्क उपलब्ध करून द्यावेत.

त्यामुळे ऑक्सिजनची गळती होणार नाही. ऑक्सिजनचा वापर नियंत्रित करण्याकरिता ज्या रुग्णांना मास्कची आवश्यकता नाही, त्यांना मास्कऐवजी ‘नसल प्रोलग्स’द्वारे ऑक्सिजन पुरवा. त्यामुळे ऑक्सिजनचा अपव्यय होणार नाही.

आयसीयू युनिटमधील तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना वेळच्या वेळी ऑक्सिजन युनिट/वॉर्डमध्ये स्थलांतरित करावे. रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी संपूर्ण यंत्रणेचे वेळोवेळी लेखापरीक्षण करावे. ‘एचएफएनओ’ चा कमीतकमी वापर करावा, जेणेकरून ऑक्सिजनची बचत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.