पिंपरी : देशात एक मे पासून अठरा वर्षांवरील सर्वजण कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र असतील. लसीसाठी 18 ते 45 वयोगटातील सर्वांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. लसीकरण नोंदणीसाठी आज (बुधवार, दि.28) दुपारी चार वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. थेट रुग्णालयात जाऊन नोंदणी करता येणार नाही.
लस घेण्यासाठी पात्र असलेल्या 18 वर्षांवरील नागरिकांना cowin.gov.in, आरोग्य सेतू व उमंग मोबाईल ॲपच्या मदतीने नोंदणी करता करता येईल. एक मे रोजी राज्य सरकार व खासगी लसीकरण केंद्रावर लसीच्या उपलब्धतेनुसार अपॉइंटमेंट दिली जाईल. आज दुपारी चारनंतर नोंदणी सुरू होणार आहे.
देशात सध्या सिरम इंन्सिट्यूटची कोव्हीशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय रशियाच्या स्पुटनिक लसीच्या आपात्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे.