पिंपरी चिंचवड महापालिकेला भेट; पहा काय म्हणाले

0

पिंपरी : जुलै ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं काही तज्ज्ञ सांगत आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे. परदेशातून लस आयात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली तर खूप बरं होईल. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या दोन्ही कंपन्यांकडून लस बनवण्याची क्षमता पाहता, भारतातील लसीकरण व्हायला बराच कालावधी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी येथे म्हणाले.

लसीकरणाचा चांगला परिणाम दिसत आहे. त्याचा उपयोग होत आहे. इतर देशातील आकडेवारी पाहता हे लक्षात येतं. इस्रायल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हाच एक कार्यक्रम व्यवस्थित राबवावा लागेल. एकमेकांना मदत करुन लवकरात लवकर हे पार पाडूयात, असं अजित पवार म्हणाले. ” ही राजकीय टीकाटिप्पणी करण्याची वेळ नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पण जे झालं ते झालं. आधी याला सामोरं जाऊ. नागरिकांचे प्राण महत्त्वाचे आहेत. त्यांचे जीव वाचवण्याला प्राधान्य देऊ, ” असं ते म्हणाले.

देशातील कोरोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, ” देशात जी लस तयार होते , तो केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्याचं वाटपही केंद्र सरकार करते . न्यायालय देखील यावर लक्ष ठेवून आहे. तेही वेगवेगळे आदेश देत आहेत. न्यायालयाने गांभीर्याने घेतलं आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये काय चर्चा सुरु आहे ती राहू दे.

“आधी परदेशात लस पाठवायची काय गरज होती ? लस आधी परदेशात पाठवली नसती तर लसींची कमतरता भासली नसती. पण जे झालं ते झालं. मात्र आता किमान तेवढ्याच प्रमाणात लस आयात करण्याची सोय करावी. अजित पवार पत्रकारांशी बोलतांना सांगितले”.

Leave A Reply

Your email address will not be published.