पूरनियंत्रण व्यवस्थापनाचे नियोजनाचे आयुक्तांनी दिले आदेश

0

पिंपरी : सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षीच्या पूरनियंत्रण व्यवस्थापनाचे नियोजन करावे. यासाठी सर्व अधिका-यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त पूरनियंत्रण आराखडा नियोजन बैठक आयुक्त पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्यलेखापरिक्षक आमोद कुंभोजकर, नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहशहर अभियंता रामदास तांबे, मकरंद निकम, प्रवीण लडकत, श्रीकांत सवणे, अशोक भालकर, मुख्य अग्निशमनअधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे , सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे डिविजनल इंजिनीअर राहुल गवारे, वायफळकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील यांसह महापालिका उपआयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे सन २०२१ च्या पूरनियंत्रण आराखड्याची माहिती दिली.

नदीलगतची पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा असे नमूद करून आयुक्त राजेश पाटील म्हणाले, पावसाळयात वादळी वा-यासह झाडे उन्मळून पडुन मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून धोकादायक वृक्षाची छाटणी करून घ्यावी. महानगरपालिकेच्या हद्यीमध्ये झालेल्या आपत्तीजन्य घटनांची माहिती नियंत्रण कक्षास देणे, नदीपात्रालगत पात्रातील झोपडपटटया व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करुन योजना ठरविणे व नदी पात्रातील अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यवाही करणे, नदी पात्रातील गाळ तसेच जलपर्णी काढणे, तसेच धोकादायक जागांचे सर्वेक्षण करणे, नाले, गटारी सफाई करणे व औषधी फवारणी करणे, पालिकेच्या हद्दीतील सर्व जुन्या इमारतीचे , वाडयांचे बांधकाम तपासणी (Structural Audit) आदी कामे पावसाळ्यापूर्वी करुन घेण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.