देशातील कोरोनाच्या रुग्णांना ‘ब्लॅक फंगस’चा धोका

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरु असताना आता ‘ब्लॅक फंगस’च सावट घोंघावत आहे. करोनामुळे ‘म्यूकोरमायसिस’ प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या आजारामुळे डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे. म्यूकोरमायसिस एक कोरोनामुळे होणारं फंगल संक्रमण आहे. अशा प्रकारे ब्लॅक फंगस पिंपरी चिंचवड शहरात काही रुग्ण आढळून आल्याचे यापूर्वीच महापालिकेने जाहीर केले आहे.

‘आम्हाला कोरोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसात म्यूकोरमायसिस पीडित सहा रुग्ण भरती झाले आहेत. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता. यामुळे कित्येक लोकांना अंधत्व आलं होतं. तसेच नाक आणी गळ्याचं हाड गळून गेलं होतं.’ असं गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनिष मुंजाल यांनी सांगितलं आहे.

वॉर रूममध्ये घोटाळा होत असल्याच्या आरोपानंतर भाजपा खासदाराने मागितली कर्मचाऱ्यांची माफी –
‘मधुमेह असलेल्या कोरोना रुग्णांवर स्टेरॉईडचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण त्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता आहे’, असं ईएनटी विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितलं. ब्लॅक फंगसची लक्षण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. खासकरून मधुमेह, किडनी, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांनी पीडित लोकांमध्ये ही समस्या अधिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.