रेमडेसिवीर काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना अटक

10 लाखांची 21 इंजेक्शन जप्त; वाकड पोलिसांची मोठी कामगिरी

0

पिंपरी : शहरात कोरोना रुग्णांची वाढ होत असून उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुडवडा जाणवत आहे. याचा गैरफायदा घेत काळ्या बाजारात विक्री रेमडेसिवीर विक्री करणाऱ्या 3  जणांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची 21 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली. अटक केलेले दोन आरोपी रुग्णालयात तर एक मेडिकल मध्ये काम करतो.

कृष्ण रामराव पाटील (22, रा. थेरगाव), निखिल केशव नेहरकर (19, बिजलीनगर, चिंचवड), शशिकांत रघुनाथ पांचाळ (34, रा. थेरगाव) या तिघांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, 9 मे रोजी काळेवाडी फाटा येथील आठवण आठवण समोर वाकड पोलिसांनी रात्रीच्या वेळी नाकाबंदी केली होती. यावेळी संशयितांना ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी कृष्णा पाटील आणि निखिल नेरकर यांच्या ताब्यातून दोन रेमडेसिवीरची इंजेक्शन जप्त केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरची इंजेक्शन हे आरोपी शशिकांत पांचाळ यांनी विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शशिकांत पांचाळ याला ताब्यात घेऊन त्याच्या गाडीची झडती घेतली असता सीटच्या खालील बाजूस 19 रेमडेसिवीरची इंजेक्शन मिळून आली.

आरोपी कृष्णा पाटील हा क्रिस्टल हॉस्पिटल येथे कामाला आहे. तर आरोपी निखिल नेहरकर हा ओनेक्स हॉस्पिटल बिजलीनगर येथे कामाला आहे. तर आरोपी पांचाळ याचे आयुश्री मेडीकल नावाचे दुकान आहे. हे तीन आरोपी एमआरपी किमतीपेक्षा जादा दराने रेमडेसिवीरची इंजेक्शन विक्री करीत होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भाटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक संतोष पाटील, सुनील टोणपे, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव, संतोष पाटील, उपनिरीक्षक अवधूत शिंगारे पोलीस कर्मचारी दत्तप्रसाद चौधरी जितेंद्र जाधव, जितेंद्र उगले आतिष जाधव, होमगार्ड निखिद सपकाळ व रोहन गुंड, अन्न व औषध प्रशासनाच्या भाग्यश्री यादव आणि श्रुतिका जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.