मुंबई : सध्या प्रत्येकांच्या जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे व्हाट्सअप्प झाले आहे. या व्हाट्सअप्प वर येणारे मेसेज, फोटो इतरांपासून लपवायचे असतील तर त्यांना या ट्रिकची माहिती असायला पाहिजे. कारण इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सअप्प त्यांच्या युजर्सना अॅपमध्ये चॅट सुरक्षित ठेवण्यासाठीचं एक फीचर देतं आहे. त्यामुळे तुमचं चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होणार आहे. न
तुम्ही तुमच्या अॅपवर फिंगरप्रिंट लॉक लावू शकता. खास बाब म्हणजे हे लॉक अगदी सहजपणे अॅक्टिव्हेट करता येईल आणि तितक्याच सहजपणे ते वापरता येईल.
सर्वात आधी तुम्ही तुमचं व्हॉस्टअॅप ओपन करा. होम पेजवर उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉट्स दिसतील, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील, त्यापैकी Settings वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर Account चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता Privacy या पर्यायावर क्लिक करा.
Privacy वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील, त्यापैकी सर्वात शेवटी Fingerprint Lock असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करुन Unlock with fingerprint वर क्लिक करा.
आता तुम्हाला फिंगरप्रिंट रजिस्टर करण्यास सांगितंल जाईल. फिंगरप्रिंट रजिस्टर या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही तुमच्या आवडीनुसार फिंगंरप्रिंट लॉक टाईम सेट करु शकता.
यामध्ये तुम्हाला तीन पर्याय मिळतील, तुमच्या सोयीनुसार तुम्ही Immediately, After 1 minute, After 30 Minutes या तीनपैकी एकाची निवड करु शकता.
यामध्ये तुम्ही Immediately हा पर्याय निवडलात तर अॅप बंद होताच तुमचं लॉक अॅक्टिव्हेट होईल. तर After 1 minute, After 30 Minutes यापैकी कोणताही एक पर्याय निवडल्यानंतर अनुक्रमे 1 मिनिट किंवा 30 मिनिटांनंतर तुमचं लॉक अॅक्टिव्हेट होईल.