देहविक्री करणा-या महिलांच्या निधीचा अपहार करणा-‍यांचा जामीन फेटाळला

0
पुणे : देहविक्री करणा-‍या महिलांना शासनाने दिलेल्या मदत निधीचा अपहार केल्याप्रकरणातील पाच जणांचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी हा आदेश दिला.
गौरी तेजबहाददूर गुरूंग (वय 32), सविता अशोक लष्करे (वय 30) सारिका अशोक लष्करे (वय 30), अमोल दत्तात्रय माळी (वय 25) आणि महेश राजू घडसिंग (वय 26) अशी त्यांची नावे आहेत.
जानेवारी 2021 ते 26 एप्रिल 2021 दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत महसुल विभागाचे नायब तहसिलदार प्रकाश सिधदेश्वर व्हटकर (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जामीन मिळावा यासाठी आरोपींनी न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील किरण बेंडभर यांनी विरोध केला. आरोपींनी केलेला गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. तपासाची व्याप्ती मोठी असून गुन्ह्यातील प्रसाद सोनवणे व अन्य साथीदारांना अटक करायची आहे. सर्व आरोपींनी आपसात संगनमत करून कट रचून मोठ्या प्रमाणावर शासकीय निधीचा अपहार केला आहे. सरकारी पक्षाचा पुरावा नष्ट करतील तसेच तपासात अडथळा निर्माण करतील त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्यात यावा, असा युक्तिवाद अ‍ॅड. बेंडभर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत पाचही जणांचा जामीन अर्ज नामंजूर केला.अनुदानाचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला :
आरोपी या कायाकल्प संस्थेच्या पदाधिकारी व सभासद असताना तसेच सामाजिक कार्य करत असताना देहविक्री करणा-‍या महिलांची कोरोना काळात उपासमार होऊ नये म्हणून शासनाने दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेतला. तसेच, शासकिय निधिचा अपहार केला असून त्याचा तपास सुरू आहे. आरोपींना जामिनावर सोडल्यास त्या फरार होतील, असे ॲड. बेंडभर यांनी न्यायालयास सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.