परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या, ‘प्रदीप शर्मा कडे 10 कोटी दे’

0

मुंबई : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून तुर्तास दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज पुन्हा परमबीर सिंग यांच्यावर नवा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट सट्टेबाज सोनू जालान याने आरोप केले असून त्याने स्वत: हून सीआयडीकडे जाऊन आपला जबाब नोंदवला आहे.

सोनू जालान याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) नोंदवलेल्या जबाबानुसार, एखाद्या मोठ्या प्रकरणात जर अटक टाळायची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना 10 कोटी रुपये दे असे परमबीर सिंग यांनी मला सांगितलं होतं. असा जबाब सोनू जालान याने दिला आहे.

जालान याने परमबीर सिंह, प्रतीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार यांच्यावर वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांची सध्या सीआयडी चौकशी करत आहेत. या प्रकरणी परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मा यां दोघांनी सोनू जालान याच्या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सोनू जालान याने आपल्या जबाबात सांगितले की, मे 2018 मध्ये एका सट्टेबाजीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या ‘अँटी एक्स्टॉर्सन सेल’ने त्याला अटक केली होती. त्यानंतर आपल्याला तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे नेण्यात आले होते. सिंह यांनी मला भारतातील सक्रिय क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्यांची माहिती विचारली. तसंच मला कुटुंबियातल्या सदस्यांसह एका मोठ्या प्रकरणात अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे अटकेपासून बचाव करायचा असेल तर प्रदीप शर्मा यांनी 10 कोटी देण्यास सांगितल्याचा आरोप जालान याने जबाबात केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.