पिंपरी : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान, यष्टीरक्षक आणि हिलेकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध असलेल्या महेंद्र सिंग धोनी पिंपरी चिंचवडकर झाला आहे. कारण धोनी याला अनेक वेळा आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अथवा आयपीएल मॅच खेळण्यासाठी संघासोबत पुणे येथील गहुंजे स्टेडियमला यावं लागतय. त्यामुळे त्याने स्टेडियम शेजारील एका गृहप्रकल्पात स्वतःचे घर घेतले आहे.
गहुंजे स्टेडियम परिसरातील किवळे येथील बांधकाम पूर्ण होत आलेल्या एका प्रोजेक्ट मध्ये घर घेतले आहे. या नंतर कोणत्याही मॅचसाठी पुण्यात येणे झाल्यास धोनी या ठिकाणच्या आपल्या घरी मुक्कामाला येत असे. एसताडो प्रेसिडेंशियल असे या सोसायटीचे नाव आहे जिथे धोनी यांनी फ्लॅट घेतला आहे आणि पुण्यात दौरा केल्यास ते याच घरात येऊन राहतात.
येथील रहिवासी सांगतात सकाळी 5 वाजता महेंद्र सिंग धोनी जॉगिंग साठी बाहेर पडत असे आणि टेरेसवर नेट प्रॅक्टिस करतांनाही त्यांना अनेक वेळा पाहण्यात आले आहे. घर घेतल्यानंतर किमान 4 ते 5 वेळा धोनी हा या त्याच्या पिंपरी चिंचवड मधील घरी आलेला आहे. मात्र बरेच दिवस तो इकडे आला नसल्याचे सोसायटीमधील रहिवाश्यांनी सांगितले.