‘नैसर्गिक ऑक्सिजन’ शुध्द हवा, समाजातील प्रत्येकाची गरज : आर्यनमॅन कृष्ण प्रकाश
ध्येयवेड्या तरुणांचा स्टार्टअपमधून राज्यातील पहिलाच प्रयोग
O2 झोन अर्बन ऑक्सीजियो सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचेउद्घाटन पोलिस आयुक्त तथा आर्यनमॅन कृष्णा प्रकाश यांचे हस्ते ऑनलाइन करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, O2 झोनचे संचालक शेखरखंडागळे, सिध्दनाथ ठोकळे, सचिन वाघमारे उपस्थित होते. याप्रसंगी खासदार अमोलकोल्हे, महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.नासा सारख्या संशोधन संस्थेने ऑक्सिजन देणा-या झाडांना मान्यतादिली आहे. त्या झाडांचा उपयोग करुन ‘O2 झोन’ कंपनीने इंडोर प्लॅटेशनकरुन नैसर्गिक शुध्द हवा आणि ‘ऑक्सिजन’ मिळणार आहे. ही झाडे आपण घर, ऑफिस, बॅंक, हॉस्पिटल,शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणे झाडांची लागवड करण्यातयेईल. या झाडांची संपुर्ण देखभाल ही कंपनी करणार आहे. विशेषता यापुर्वीची घरामधील हवाआणि झाडांच्या लागवडीनंतर मिळणारी शुध्द हवा, याविषयी कंपनी तपासणी अहवाल देणारआहे. तसेच या कंपनीच्या माध्यमातून आपण लोकांना लागणारा ऑक्सिजन, स्वच्छ हवा,याविषयी संपुर्ण माहिती देवून इनडोअर प्लॅटेशन कसे करावे, याकरिता आम्ही काम करणारआहोत.
देशासह राज्यात नासाने मान्य केलेल्या ऑक्सिजन देणा-याझाडांचे वृक्षारोपण व संगोपन करणारी ही एकमेव कंपनी आहे. इनडोअर प्लॅटेशन करुन प्रत्येकझाडांची ओळख, ते झाड कुठे लावायचे, त्याची निगा कशी ठेवायची, याविषयी सखोलमार्गदर्शन करणार आहे. सध्यस्थिती ऑक्सिजनची लागणारी गरज पाहता आपण नैसर्गिक वशुध्द हवा तयार करण्यासाठी ही कंपनी काम करणार आहे.
कंपनीचे संचालक सिध्दनाथ ठोकळे म्हणाले की, कोरोनाने आपल्याला चांगलाच धडा शिकविला आहे.भविष्यात अनेक आव्हानांनातोंड द्यावे लागणार आहे. शासनाने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची सोय केली. पणकृत्रिम ऑक्सिजनपेक्षा नैसर्गिकशुध्द हवा आरोग्यास पोषक असते. इनडोअर प्लॅटेशनमुळे ऑक्सिजनचा तुटवडा हा पूर्णपणेसंपेल असं नाही. परंतु, काही प्रमाणातयाचा उपयोग निश्चित होईल. तसेच या कंपनीच्या प्रयोगामुळे शासनाला योग्य तो हातभारलावू शकतो.