मुंबई : राज्य सरकार दहावी पाठोपाठ बारावीची परीक्षा (HSC) रद्द करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवलेला आहे. पण अजूनही बारावीची परीक्षा रद्द करायची की नाही, याबाबत अंतिम निर्णय झाला नाहीये.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मंत्र्यांची बारावीची परीक्षा रद्द करण्यास सहमती असल्याचं सांगण्यात येत आहे. “शिक्षण विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला या संदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावर येत्या 1-2 दिवसात निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य आहे” असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान काल 1 जूनला केंद्र सरकारने सीबीएसई (CBSE) बोर्डाची 12वी ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. याआधी 20 एप्रिलला दहावीची परीक्षा (SSC) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.