मुंबई : मुंबईतील रिअॅलिटी कंपनी प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका आठवड्यापासून मोठी वाढ होत आहे. फक्त एका आठवड्यात कंपनीचे शेअर्स 100 टक्क्यांनी वाढले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये आपल्या देशातील दोन महत्वाच्या गुंतवणुकदारांनी देखील पैशांची गुंतवणूक केली आहे.
या कंपनीच्या शेअर्समध्ये राकेश झुंनझुंनवाला आणि डी-मार्टचे फाउंडर राधाकिशन दमानी यांनी गुंतवणूक केली आहे. या कंपनीत झुनझुनवाला यांची भागीदारी 2.06 टक्के आहे. म्हणजेच त्यांचे 31,50,000 शेअर्स आहेत. तर दमानी यांचे 1.26 टक्के म्हणजेच 19,25,000 शेअर्स आहेत.
शेअर्सने फक्त 7 ट्रेडिंग सेशनमध्ये जवळपास 100 टक्के रिटर्न दिले आहेत. 26 मे रोजी शेअर्सचा दर 20.4 रुपये होता, तो आता जवळपास 100 टक्क्यांनी वाढून 40.25 रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारीदेखील स्टॉकमध्ये 5 टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं आहे.
स्टॉकच्या दरामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने कंपनीची मार्केट कॅप दुप्पट झाली आहे. 26 मे रोजी शेअरच्या दरावर कंपनीची मार्केट कॅप 302.92 कोटी रुपये होती. ती वाढून आता 614.23 कोटी रुपये झाली आहे.