नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरी आता एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. धोनीची मुगली झिवाने आपल्या सोशल मीडियावर या नवीन पाहुण्याचा एक फोटो पोस्ट केला आहे.
झिवाने आपल्या इंटाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झिवा एका अश्वाबरोबर दिसत आहे. झिवा या अश्वाच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवत आहे. झिवाने आपल्या इंस्टाग्रामवर हाच फोटो शेअर केला आहे. हा फोटो आता चांगलाच व्हायरल झाला असून त्याला दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी लाइक्स दिले आहे.
यापूर्वीही धोनीने एक अश्व आपल्या घरी आणला होता. त्या अश्वाचे नाव चेतक होते. धोनीची पत्नी साक्षीने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आमच्या घरात एक नवीन सदस्य आला असून आम्ही त्याचे स्वागत करत आहोत, असे साक्षीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. काही दिवसांपूर्वी साक्षीने पुन्हा एकदा या अश्वाला मसाज करत असतानाचा फोटो शेअर केला होता.