आगामी महापालिका निवडणुकीत ‘दोन सदस्य वार्ड’चे संकेत

0

पुणे : भारतीय जनता पक्षाने सरकारमध्ये असताना त्यांना जे योग्य वाटले त्यानुसार महापालिका निवडणुकीत वॉर्ड रचना केल्या. आता महाविकास आघाडीचे सरकार असून, योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र, पुण्याबाबत विचार केल्यास माझ्या वैयक्तीक मते दोन सदस्यी वॉर्ड असावा. मात्र या बाबतचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. पुणे महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असून, त्याची राजकीय पक्षांच्या इच्छूकांकडून तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे प्रशासनालाही निवडणूक पूर्व तयारी करावी लागणार आहेत. गेल्या निवडणुकीवेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. त्यावेळी चार सदस्यीय वॉर्ड रचना केली. त्याचा पुण्यात भाजपला फायदा झाला, अशी चर्चा झाली होती.

आगामी मनपा निवडणुकीत वॉर्ड कसे असावेत, याविषयी उपमुख्यमंत्री पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, मागील निवडणुकीवेळी भाजपचे सरकार होते. त्यांनी योग्य वाटले त्यानुसार चार सदस्यीय वॉर्ड रचना केली. आता महाविकास आघाडीचे सरकार असून, योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र, पुण्याबाबत विचार केल्यास माझ्या वैयक्तीक मते दोन सदस्यी वॉर्ड असावा, असे वाटते. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ नेते घेतील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.