पुणे : पुण्याजवळील पिरंगुट एमआयडीसीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. उरवडे गावाच्या परिसरात असलेल्या सॅनिटायझर तयार करणार्या कंपनीला लागेल्या भीषण आगीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आग लागली तेव्हा कंपनीत सुमारे 40 ते 45 कामगार होते. त्यापैकी 15 जणांचे मृतदेह आढळून आले असल्याची माहिती मिळाली आहे.
शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मोठया प्रमाणावर जीवितहानी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
कंपनीत सॅनिटायझर बनवण्याचे काम करण्यात येते. आग लागल्यानंतर लगेचच आगीने रौद्ररूप धारण केले.
आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह (Pune killed 15 people) बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पौड पोलिस तसेच मुळशीचे तहसीलदार घटनास्थळी उपस्थित आहेत.
अग्नीशमन दलाच्या जवानांनी आणि अधिकार्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवत सध्या कुलिंगचं काम सुरू केलं आहे. दरम्यान, आग लागल्यानंतर बघ्यांनी परिसरात तोबा गर्दी केली आहे. आग विझवण्यासाठी आणि कामगारांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या मदतीने भिंत फोडण्यात आली आहे.