‘रेमडीसीवर’ नंतर ‘अँटी फंगल इंजेक्शन’ची काळया बाजारात विक्री करणारे गजाआड

0

पिंपरी : कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी प्रभावी असल्याचे म्हटले जात असलेल्या रेमडीसीवर इंजेक्शनचा राज्यात, शहरात मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू होता. यानंतर आता काळया बाजारात anti fungal अँटी फंगल anti fungal या साथीच्या आजारावरील इंजेक्‍शनची विक्री सुरु झाली आहे. काळाबाजार करणाऱ्या एका महिलेसह चौघांना गुंडा विरोधी पथकाने वाकड येथे सापळा अटक केली आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

गौरव जयवंत जगताप (३१, रा. काळाखडक रोड, वाकड), अमोल अशोक मांजरेकर (३९, रा. सूसरोड, पाषाण, पुणे), गणेश काका कोतमे (३२, रा. जनता वसाहत, पुणे) आणि एक महिला आरोपी (२४, रा. ज्ञानदीप शाळेजवळ, पालांडे यांच्या घरी, रुपीनगर, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर बसवराज (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांना खबऱ्यांकडून वाकड येथे काही जण अँटी फंगल या साथीच्या आजारावर वापरण्यात येणारे
D Liposomol Amphoteriein-B Injection या औषधाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाने सापळा लावून चार जणांना अटक केली.

त्यांच्याकडून अँटी फंगलवरील इंजेक्‍शनचे तीन नग हस्तगत करण्यात आले. त्यांनी हे औषध काळ्या बाजारात विक्रीसाठी आणले होते. तपास पोलीस करत आहेत.

ही कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने, हजरत पठाण, गणेश मेदगे, शुभम कदम, राम मोहिते, विनोद तापकीर यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.