एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीसमध्ये चार वर्ष सुरू होते शासनाच्या परवानगी शिवाय उत्पादन

कंपनीच्या मालकास १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी

0

पुणे : आग लागून १७ कामगारांचा मृत्यू झालेल्या उरवडे-पिरंगुट एमआयडीसीमधील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीत २०१६ ते २०२० दरम्यान  शासनाच्या परवानगी शिवाय उत्पादन व व्यवसाय सुरू होता, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आले आली. या कंपनीच्या मालकास अटक करण्यात आली असून त्याची १३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

निकुंज बिपिन शहा (वय ३९, रा. मयुरेश्‍वर अपार्टमेंट, सहकारनगर) असे अटक करण्यात आलेल्या मालकाचे नाव आहे. तर बिपिन जयंतीलाल शह (वय ६७) आणि केयूर बिपिन शहा (वय ४१) यांच्याविरोधात पौड पोलिस ठाण्यात भादवि कलम ३०४(२) सदोष मनुष्यवध) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीमध्ये अनधिकृतपणे सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात साठ केल्यास कंपनीस आग लागू शकते व त्यामुळे कामगारांचा जीव जाऊ शकतो या पूर्व कल्पना असताना देखील कामगारांचा सुरक्षीततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. कंपनीमध्ये उत्पादन सुरू ठेवण्यासाठी लागणारा कच्चा माल किती व कोणाकडून आणला,? सॅनिटायझर तयार करण्यासाठी शासनाकडून देण्यात येणा-या परवानग्या आरोपींनी घेतल्या होत्या का? कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन घेण्याची परवानगी कंपनीला देण्यात आली होती? तयार झालेले सॅनिटायझर कोणाला विकले? कंपनीने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागास सॅनिटायझर उत्पादन व साठा याबाबत माहिती दिली होती का? या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केली. त्यानुसार  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. गणपा यांनी आरोपीस पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सर्इ-भोरे-पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.