यंदाही पायी वारी आणि विठ्ठल दर्शन नाहीच; वाखरी पासून पायी वारीस परवानगी

0

पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आषाढी वारीबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकीत चर्चा केली. त्यानंतर देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना परवानगी देण्यात आल्याचे सांगितले आहे. तसंच 10 मानाच्या पालख्यांसाठी 50 जणांना सहभागी होता येणार आहे. पालखीसोबत वारकऱ्यांना चालत जाता येणार नाही. प्रत्येक पालखीला 2 बसेस असं दहा पालख्यांना 20 बसेस दिल्या जातील.

मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपूरात होईल. वाखरीत विशेष वाहनाने पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरपर्यंत पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पंढरपूरचे मंदिर दर्शन खुले करण्यात येणार नाही असं अजित पवार यांनी सांगितलं.

कसा असणार पायी वारी सोहळा

– पालखी यंदाही बस मधूनच पंढरपूरकडे जाणार

– लवकरच शासन त्याबद्दल सविस्तर आदेश काढणार आहे

– इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत

– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी बंधनकारक

– काला आणि रिंगण सोहळ्याला परवानगी दिली

– रथोत्सवला ही परवानगी, त्यासाठी १५ वारकऱ्यांना परवानगी

– प्रत्येक पालखीसोबत 40 वारकऱ्यांना परवानगी

– प्रस्थान सोहळ्याला 100 वारकऱ्यांची उपस्थिती

दहा मानाच्या पालख्या क्रम

०१) संत निवृत्ती महाराज ( त्रंबकेश्वर )

०२) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )

०३) संत सोपान काका महाराज ( सासवड )

०४) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )

०५) संत तुकाराम महाराज ( देहू )

०६) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )

०७) संत एकनाथ महाराज ( पैठण )

०८) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )

०९) संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )

१०) संत चांगटेश्वर महाराज ( सासवड )

Leave A Reply

Your email address will not be published.