पुणे : पुण्याच्या कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या आत आला आहे. त्यामुळे सोमवारपासून कोरोना निर्बंध अधिक शिथिल करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच पिंपरी चिंचवडसाठी निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. कारण त्याठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या वरती असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली.
पुण्यातील निर्बंध येत्या सोमवारपासून आणखी शिथिल होत आहेत. यात दुकाने आता 7 वाजेपर्यंत सुरु करण्यास मुभा देण्यात येणार आहेत. तसेच रेस्टारंट, हॉटेल 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मॉल सोमवारपासून सुरु ठेवता येतील. तसेच अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यात येतील. असे असले तरी चित्रपट गृहे, नाट्यगृहे बंदच राहतील. अशी माहिती पवारांनी दिली. हे नवे नियम सोमवारपासून लागू होतील.
सोमवारी मॉल बाबत नियमावली जाहीर करण्यात येईल. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील, हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू राहील. पुण्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुरू केली जाणार नाहीत. अभ्यासिका, वाचनालय सुरू केले जाणार आहेत. दिव्यांगाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे, असं अजित पवार म्हणाले. असे असले तरी लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास इतर ठिकाणीही निर्बंध शिथिल करण्यात येतील, असं अजित पवार म्हणाले.