पुणे : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना कपडे धुवायला लावलेल्याचा कैद्याच्या कारगृहातून बाहेर येताच निर्घृण खून करुन मृतदेह सातारा जिल्ह्याच्या हद्दीत टाकला.
मंगेश सुरेंद्र पोम (35 रा. पोमणनगर, ता. पुरंदर) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर वैभव सुभाष जगताप (28 रा. पांगारे, ता. पुरंदर) याला लोणंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याचा साथीदार ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मयत मंगेश पोम हा काही दिवसांपूर्वी एका गंभीर गुन्ह्यात पुण्यातील येरवडा कारगृहात शिक्षा भोगत होता. तर आरोपी वैभव हा देखील एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगायला येरवडा कारागृहात आला होता. याच दरम्यान मयत मंगेश याने वैभवला पाय दाबायला लावणे, कपडे धुवायला लावणे अशी कामे लावली होती. याचा राग वैभवला आला होता. हे दोघे शिक्षा भोगून बाहेर आले होते.
वैभव याने साथिदार ऋषीकेशच्या मदतीने मंगेशचा निर्घृण खून केला. यानंतर त्याचा मृतदेह खंडाळा तालुक्यातील वाठार बुद्रुक गावच्या हद्दीत टाकला.
पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपी वैभवला अटक केली आहे.