राज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

0

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला मागच्या आठवड्यात मान्सूननं व्यापलं आहे. अनेक ठिकाणी जोरदार मुंसडी मारली आहे. यानंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पण आजपासून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत मान्सूनचं आगमन झाल आणि पावसानं मुंबईकरांना चांगलंच झोडपून काढलं. पहिल्या पावसातचं मुंबईकरांची पुरती तारांबळ उडाली होती.
पण मागील दोन दिवसांपासून मुंबईला पावसानं विश्रांती दिली आहे.

मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज पुन्हा मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.