लोणावळ्यातील डाॅक्टरच्या बंगल्यात सशस्त्र दरोडा; 67 लाखांचा ऐवज लंपास

0

लोणावळा : लोणावळ्यातील प्रसिद्ध असणाऱ्या डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांनी आज पहाटे सशस्त्र दरोडा टाकला आहे. 50 लाख रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर किंमती ऐवज असा साधारण 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे. गुरुवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला.

दरोडेखोरांनी पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलली. सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले तर अन्य काही जण घराबाहेर थ‍ांबले होते. डाॅक्टर खंडेलवाल यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने दरोडेखोर थेट घरात घुसले.

दरोडेखोरांनी डाॅक्टर व त्यांच्या पत्नी यांच्या गळ्याला धारदार हत्यार लावले. त्यानंतर त्यांचे हात पाय बांधले आणि घरातील सर्व रोख रक्कम व किंमती ऐवज लंपास केला.

घटनेची माहिती समजल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पद्माकर घनवट यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.