पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आनंदाचे क्षण साजरे करु न शकलेल्या वंचित लेकींना आ. चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून ड्रेसचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, प्रदेश महिला आघाडी चिटणीस वर्षाताई डहाळे, नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, नगरसेवक जयंत भावे, वात्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि कोथरूड मंडल सरचिटणीस प्रा.अनुराधा येडके, पुणे शहर सहकार आघाडीचे प्रभारी श्री.प्रकाशतात्या बालवडकर, श्री.राजेंद्र येडे, श्री.राज तांबोळी, श्री.चंद्रकांत पवार, कोथरूड मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षा पल्लवी गाडगीळ, जानवी जोशी, सौ.मुग्धा दत्ता-जोशी, सौ.जयश्री तलेसरा, कु.दीपाली गुर्जर, कु.मृदुला उपगडे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बसला. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून त्यांना कोणत्याही प्रकारे सण-समारंभ साजरा करता आला नाही. परिणामी त्यांच्या मुलांनाही या आनंदाच्या क्षणापासून मुकावे लागले. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वंचित घटकांना मदतीचा एक हात देण्याचे ठरवले होते.
त्यानुसार आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरूडमधील वंचित लेकींना ड्रेस मटेरियल चे वाटप केले व त्यासोबत शिलाई चा खर्च ही दिला.ही अनोखी भेट मिळाल्याने सर्व मुलींनी मोठा आनंद व्यक्त करत, आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले.