राज्य सरकार आणि मराठा समन्वयक यांच्यात कोणती चर्चा झाली

0

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं होत. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे 7 मागण्या केल्या

राज्य सरकार रिव्ह्यू पिटीशन दाखल करणार

पुढील आठवड्यात फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार

योग्य तयारी करुन कोर्टात भूमिका मांडू

संभाजीराजे यांच्या मागणीनुसार रविवारी सारथीबाबत उपमुख्यमंत्री बैठक घेतील

मराठा समाजाच्या रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लावण्याच्या एमपीएससीला सूचना

आपली चर्चा सुरू राहील तुम्ही आंदोलनाबाबत फेरविचार करावा असं मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं आहे

गुन्हे दाखल झालेले आहेत त्याबाबत एक केस वगळता इतर सर्व केसेसमधील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे

बैठकीतील राज्य सरकारकडे केलेल्या प्रमुख 5 मागण्या

1) मराठा आरक्षणामुळे 2014 ते पाच मे 2021 पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्याव्यात.

2) ‘ओबीसी’च्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा

3) ‘सारथी’ संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ‘सारथी’ संस्थेची उपकेंद्रे सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तत्काळ सुरू करावा. संस्थेला स्वायत्तता पुन्हा बहाल करावी.

4) अण्णासाहेब पाटील महामंडळाला दोन हजार कोटींचा निधी द्यावा. लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची 10 लाख रूपयांची मर्यादा वाढवून ती किमान 25 लाख रूपये करावी.

5) शासनाकडून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. मुंबई, नागपूर, पुणे अशा महानगरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 3000 रूपये व इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 2000 रूपये प्रति महिना दिले जातात. ही रक्कम वाढवावी. शासनाकडून मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी सीट्स निर्माण कराव्यात.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब, संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत सकल मराठा समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.