दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुंता वाढला; माय-लेकराच्या मृतदेहानंतर वडिलांचाही मृतदेह आढळला

0

पुणे : सासवड परिसरात आईचा तर कात्रज परिसरात मुलाचा मृतदेह खून करुन टाकल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर तीन दिवसानंतर या प्रकरणात आणखी गुंता वाढला आहे. बेपत्ता असलेला वडिलांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास चालु असतानाच बेपत्ता असलेल्या आबिद शेखचा मृतदेह आढळला आहे.

आबिद अब्दुल शेख (38) असे मृतदेह मिळालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आयान आबिद शेख (7) आणि आलीया आबिद शेख (35) या माय-लेकाचा खुन झालेला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) सकाळी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानापूर येथील एका नदीच्या पाण्यात मृतदेह आढळून आला. त्यानंतर हवेली पोलीस व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाहणी करण्यात आली. त्यात तो मृतदेह आबिद शेख याचा असल्याचे समोर आल्यानंतर ही माहिती पुणे ग्रामीण पोलीस यांनी तात्काळ पुणे पोलिसांना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.