लोणावळ्याचा भुशी डॅम ‘ओवरफ्लो’

0

लोणावळा : येथील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला भुशी डॅम ‘ओवरफ्लो’ झाला आहे. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून धरणारकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. मात्र पर्यटन बंदीच्या आदेशामुळे पर्यटकांना पर्यटन स्थळावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळं पर्यटकांची निराशा होत आहे.

लोणावळ्यातील पर्यटन स्थळावर पर्यटक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्याचा लोणावळा शहर पोलिसांनी इशारा दिला आहे.
सर्वत्र रस्त्यांवर पाणी साचलं आहे.

रस्त्यावर मुसळधार पावसामुळं ठराविक अंतराच्या पुढील काही दिसत नाही, त्यामुळे वाहन चालकांनी खूप काळजी घ्यावी. रस्त्यावर गर्दी करू नये, वाहने नियंत्रित वेगात चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.