सरनाईक जेलच्या भीतीने चिंताग्रस्त, पण ते जेलचे पाहूणे होणारच

0

मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यानंतर किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. प्रताप सरनाईक जेलच्या भीतीने चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. मात्र ते जेलचे पाहुणे होणारच असे सोमय्या यांनी ट्विट केले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याने राज्यातील राजकारण तापलेले दिसत आहे. राज्यामध्ये काँग्रेसकडून वारंवार स्वबळाचा नारा दिला जात आहे. असे असतानाच आता यामध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बने भर घातली आहे. भाजपसोबत युती करण्याची मागणी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. यामुळे ही राजकारणातील मोठी घडामोड मानली जात आहे. यानंतर किरीट सोमय्यांनी सरनाईकांना इशाराच दिला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा जुळवून घ्यावे असे आवाहन केले आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत आहे म्हणूने ते असे म्हणत आहेत असे सोमय्या म्हणाले आहेत.

‘शिवेसेनाचे आमदार प्रताप सरनाईक “जेल” च्या भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर …. जेलचे पाहुणे होणारच’ असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.