मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत गेले असून ते विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांना भेटणार आहेत. यामुळे राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
आजारपणानंतर पवार दिल्लीत गेलेच नव्हते. मध्यंतरी दोन वेळा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. प्रकृती व्यवस्थित झाल्याने त्यांनी लांबवलेली दिल्ली भेट आता केली आहे. यातून कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढू नये असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांची दिल्ली भेट, नंतर शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेले पत्र, या पार्श्वभूमीवर पवार यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढणे सुरू झाले. पक्षाचे नेते पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याच्या दौर्यावर तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत.
मध्यंतरी विरोधी पक्षनेत्यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी घेतली होती. त्याच अनुषंगाने ते काही विरोधी पक्षनेत्यांना भेटतील.