मुंबई : रिक्षातून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रिक्षाचालकाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने अटक करुन त्याच्याकडून 20 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. जप्त केलेल्या कोकेनची किंमत तीन लाख रुपये आहे.
‘एनसीबी’ने मुंबईत ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने शनिवारी रात्री मुंबईत तीन ठिकाणी कारवाई केली. एक रिक्षाचालक हा रात्रीच्या वेळेस ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली.
त्या माहितीनंतर ‘एनसीबी’च्या पथकाने गोरेगावच्या नेस्को येथे सापळा रचून अफसर खान याला अटक केली.
अफसर हा पहाटेच्या वेळेस रिक्षाने मीरा रोडला जात असायचा. तो एका नायजेरियनकडून ड्रग्ज घेत असायचा. तो नायजेरिन हा अफसरला कोणाला ड्रग्ज द्यायचे याची यादी आणि ड्रग्ज अफसरकडे द्यायचा