एकाच दिवशी 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसीकरण

0

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. तर देशातील 18 वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस दिली जाणार आहे.

16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एका दिवशी सर्वाधिक व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रात्री 8 वाजेपर्यंत 80,96,417 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 28 कोटी 33 लाख13 हजार 942 लोकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 23 कोटी 27 लाख 44 हजार 813 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 5 कोटी 5 लाख 69 हजार हजार 129 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

विक्रमी लसीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘केंद्र सरकार आजपासून प्रत्येक भारतीयांसाठी’ मोफत लसीकरण मोहीम ‘सुरू करीत आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेच्या या टप्प्यातील सर्वाधिक लाभार्थी देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुण असतील. आपण सर्वांनी स्वतःला लस घेण्याचा संकल्प केला पाहिजे. आपण देशातील नागरिक एकत्र येऊन कोरोनाचा पराभव करु, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.