पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने शहरातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकड याला अटक केली आहे. 22 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून ठेवी घेऊन त्यांना मोबदला न देता फसवणूक करण्यात आली आहे. पहिल्या lockdown पासून बिल्डर अमित लुंकड कोणालाही पैसे देत नव्हते.
त्यांनी अनेकांकडून गुंतवणूक घेतल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि त्यांच्या पथकाने अमित लुंकड याला अटक केली आहे. त्याने अनेकांची फसवणूक केल्याची मोठी चर्चा आहे.