कोट्यावधी रुपयांचे ‘कोरोना’साठी उपयोगी असणारी बनावट औषधे जप्त

अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई

0

पुणे : कोरोना विषाणूच्या उपचारासाठी वापरल्या जाणारे बनावट औषध विक्री विक्रीचा धंदा उघडकीस आला आहे. बनावट औषध (Counterfeit medicine) विक्री केल्याप्रकरणी सदाशिव पेठेतील एका औषध वितरकावर अन्न व औषध विभागानं मोठी कारवाई केली आहे. देशातील अनेक शहरात या औषधाचं वितरण झाल्याची संशय पोलिसांना आहे.

प्रभाकर नामदेव पाटील असं पोलिसानी अटक केलेल्या आरोपीचं नाव असून ते उमेद फार्मा सेल्स कंपनीचे भागीदार आहेत. यासोबतचं मॅक्सरिलीफ हेल्थकेअर या औषध कंपनीचे संचालक सुदीप मुखर्जी याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मॅक्सरिलीफ हेल्थकेअर ही कंपनी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अंजी येथील असून या कंपनीत बनावट औषधे तयार केल्याचं निष्पन्न झालं आहे. शिवाय या कंपनीकडे औषधे निर्मिती करण्याचा कसलाही परवाना नाही.

संबंधित कंपनीत कोरोना विषाणूच्या संसर्गावर महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या फॅविपिराविर आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधांचं नाव वापरून बनावट औषध निर्मिती केली जात होती. अलीकडेच पोलिसांनी मुंबईतून 1 कोटी 54 लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत.

त्याचबरोबर सुदीपकुमार मुखर्जी यालाही अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या अन्न आणि औषध प्रशासनानं मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनीबाबत हिमाचल प्रदेशात विचारणा केली असता, संबंधित कंपनीकडे औषध निर्मिती करण्याचा परवाना नसल्याचं समोर आलं आहे. ही कंपनी विना परवाना पाच वेगवेगळ्या औषधांची निर्मिती करत असल्याचं तपासात उघड झालं आहे. तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.